होंडाची 'ड्रीम युग'बाईक भारतीय बाजारात!

वेबदुनिया

बुधवार, 20 जून 2012 (12:34 IST)
WD
एंट्री लेव्हल बाईक प्रकारात जोरदार स्पर्धा सुरू झाली असून, आघाडीची मोटारसायकल निर्माती कंपनी होंडा मोटारसायकल इंडियाने मुंबईमध्ये त्यांच्या ड्रीम युग या मोटारसायकलचे बाजार पदार्पण केले.

या मोटारसायकलची मुंबईतील एक्स शोरूम किंमत 48,000 रुपये राहणार असून, 'ड्रीम युग' बाईकमध्ये 9 बीएचपी पॉवर देणारे 110 सीसीचे इंजीन असेल. ही मोटारसायकल एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 72 किलोमीटर चालणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वेबदुनिया वर वाचा