हवाई सफरी करणार्‍यांवर 'आयटी' वाल्यांची नजर

शुक्रवार, 29 मार्च 2013 (16:22 IST)
FILE
आपण हवाई प्रवास करत असाल मात्र आयकर भरत नसाल, तर सावधान. आयकर विभागाची आपणांवर नजर आहे. आयकर विभाग असल्या व्यक्तिंची माहिती गोळा करत आहे.

आयकर विभागानुसार देशात फक्त ४ कोटी ८२ लाख व्यक्तिच आयकर भरतात. एखाद्या व्यक्तिने वर्षभरातून ५ ते १० हवाई सफरी केल्यास त्याने ५० हजार ते १ लाख रूपये खर्च करणे साहजिक आहे.

अंदाजानुसार ५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाराच हवाई यात्रांवर लाखभर रूपये खर्च करू शकते. म्हणूनच आयकर विभागाने अशा संभावित आयकरदात्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

वेबदुनिया वर वाचा