स्विस सरकार काळा पैसा ठेवणार्‍यांची यादी देणार

सोमवार, 23 जून 2014 (10:59 IST)
परदेशी बॅंकामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या  भारतीयांच्या पैसा परत आणण्‍यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना भारत  सरकारला पहिले यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. स्विस  सरकारने काळा पैसा ठेवणार्‍यांची यादी देण्यास होकार दर्शविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंड सरकारने अशा संशयित  खात्यांची यादी तयार केली असून ती लवकरच भारत सरकारला  सोपविण्यात येणार आहे. काळा पैसा प्रकरणी भारताने नेमलेल्या  विशेष चौकशी पथकाला संपूर्ण मदत करण्‍याचे आश्वासन स्विस  सरकारने दिले आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍यांने सांगितले, की  स्विसमधील बॅंकात जमा असलेल्या पैशाचा फायदा कुणाला? या  दिशेने तपास सुरु आहे. यात काही भारतीय लोक व कंपन्यांची नाव  समोर येण्याची शक्यता आहे.

स्विस बॅंकातील परदेशी खातेदारांमध्ये भारत 58 व्या स्थानी  असल्याचे स्पष्ट झाले आहे. 283 बॅंकात जमा 96 हजार अब्ज  रकमेत भारतीयांच वाटा 0.15 टक्के आहे. या ब्रिटन अव्वल  स्थानी आहे. स्विस बॅंकेत जमा रकमेत ब्रिटनचा 20 टक्के वाटा  आहे. 

वेबदुनिया वर वाचा