रशियात कार उत्पादन 63 टक्क्यांनी घसरले

रशियात चालू वर्षातील पहिल्या दहा महिन्यात कार उत्पादन 63 टक्क्यांनी घसरले आहे. रशियन प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा हा परिणाम आहे.

या दहा महिन्यात देशात 5,78,093 कार तयार करण्यात आल्या.मागील वर्षांच्या तुलनेत यात मोठी घसरण झाली आहे.

या दरम्यान देशातील विदेशी ब्रांडच्या कार उत्पादनात 44 टक्क्यांची घसरण झाल्याने ते 2,27,552 कारवर आले आहे. रशियातील अनेक उद्योगांना मंदीचा फटका बसला असून, यात ऑटो उद्योगाचाही समावेश आहे.यापूर्वी देशात कधीही कार उत्पादनात घसरण झाली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा