मोबाईलद्वारे पेमेंटला रिझर्व्ह बॅंकेचा लगाम

वार्ता

बुधवार, 23 जुलै 2008 (15:37 IST)
मोबाईलद्वारे पेमेंट करण्याच्या सेवेला रिझर्व्ह बॅंकेने लगाम घातला आहे. काही बॅंकांनी मोबाईलद्वारे पैशांच्या हस्तांतरणाची सेवा सुरू केली आहे. रिझर्व्ह बॅंकेची परवानगी नसताना वा बॅंकेने दिलेल्या आदेशाच्या कार्यकक्षेत ही सेवा नसल्यास बॅंकांनी त्यापासून दूरच राहिले पाहिजे, असे बॅंकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यासंदर्भात अनेक मुद्यांवर विचार सुरू आहे. त्यानंतर याबाबतीत बॅंकांना अंतिम दिशानिर्देश दिले जातील, असे बॅंकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या कोणत्याही आदेशाची वाट न पहाता बॅंकांनी ही सेवा सुरू केली आहे. क्रेडिट वा डेबिट एंट्री किंवा पेमेंटच्या चौकशीसारख्या सेवेला आपला आक्षेप नसल्याचेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा