महिंद्राची इ2ओ दिल्लीत 5.96मध्ये लाँच

PR
भारतातील पहिली संपूर्ण वीजेवर चालणारी 'ऑल-इलेक्ट्रिक कार' काही वर्षांपूर्वीच रेवा इलेक्ट्रिक कार कंपनीने बाजारात आणली होती. ही कंपनी 2010 मध्ये महिंद्रने विकत घेतली. 'एनएक्सआर' या संकल्पनेतून साकारलेली 'ई-2ओ' ही कार आहे.

'ई-2ओ' आकाराने मारुती सुझुकीच्या झेन एस्टिलो या कारएवढी आहे. बी श्रेणीतील कार म्हणून ती सादर केली जाणार आहे.

पारंपरिक जळाऊ इंधन नसल्याने या गाडीला टाकीची गरज नाही. जगातील इतर इलेक्ट्रिक कारप्रमाणेच या गाडीला बॅटरी पॅक आहे. बाह्य स्त्रोताकडून ती चार्ज करणे आवश्यक असते.

वेबदुनिया वर वाचा