भारतात तयार होणार एके- 47 रायफल!

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2015 (09:56 IST)
नवी दिल्ली– जगातील सर्वात संहारक शस्त्र म्हणून ओळखले जाणारी एके ४७ रायफलींची निर्मिती भारतात होऊ शकते. या शस्त्राचे भारतात उत्पादन सुरू करण्याविषयी रशियन शस्त्रनिर्मिती कंपनीचा संचालक कलाशिकोवने भारतातील स्थानिक कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेला सकारात्मक स्वरूप मिळाल्याचे कलाशिकोवने कंपनीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
 
अनेक भारतीय कंपन्यांनी 2008 पासूनच ही रायफल निर्मिती करण्याचा विचार सुरू केला होता. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. 
 
भारतात एके- 47 रायफलचे प्रकल्प उभारण्यासाठी किमान 650 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यापैकी बहुतांश खर्च जमीन आणि उपकरणांवरच येईल. एकदा प्रस्तावित प्रकल्प सुरू झाल्यास वार्षिक 50000 रायफल निर्मिती करता येईल, असा दावा कलाशिकोवने केला आहे.

वेबदुनिया वर वाचा