भाजीपाला मोठी आवक भावात मोठी घसरण

बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (17:46 IST)
मुंबई, गुजराथ आणि देशातील अनेक ठिकाणी नाशिक येथून फळभाज्या आणि कांदा वितरीत होतो, मात्र आता कांदा पाठोपाठ भाजीपाला आणि फळभाज्याची आवक त्यामुळे भावात मोठी घसरण झाली आहे. जवळ जवळ सुमारे ३५ टक्के भव पडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे.
 
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने भाजीपालांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचे भाव घसरले असल्याची माहिती बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे.
 
जवळ- जवळ ३० ते ३५ टक्केनी भाजीपालांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यावर्षी विदर्भ आणि गुजरातमध्ये देखील भाजीपाल्यांचे  उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नाशिकच्या भाजीपाल्याची  मागणी कमी झाली असून दर घसरले आहेत.
 
 मुख्यत: यामध्ये सर्वधिक टोमॅटोचे दर घसरले आहेत. तीन ते चार रूपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. ग्रामीण भागात तर एक रूपये किलो इतका कमी भाव टोमॅटोला मिळत आहे. त्यांबरोबर कोबी,गव्हार,चवली,मेथी,कोथिंबीर या सर्वच भाजीपाल्यांचे दर १० ते १५ रुपयांचे आत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी याच भाज्यांचे दर ८० ते ९० रुपयापर्यंत पोचले होते. त्यामुळे आधीच कांद्याचे दर यावर्षी घसरले होते, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर भाजीपाल्याचे दर पडल्याने पुन्हा एक नवे संकट उभे राहिले आहे.

वेबदुनिया वर वाचा