पेट्रोल 3 रूपयांनी स्वस्त होणार

सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (09:37 IST)
नागपूर- एकीकडे रुपयासमोर डॉलर मजबूत होऊन 66 वर गेला आहे, असे असतानाही राष्ट्रीय बाजारात कच्चे तेल मात्र स्वस्त झाले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.
 
केंद्र सरकारने 2010 मध्ये पेट्रोल तर 2014 मध्ये डिझेल नियंत्रणमुक्त केले. तेव्हापासून सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही तेलकंपन्या दर 15 दिवसांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतात. या आढाव्यानुसारच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी किंवा जास्त करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार आता मागील दोन महिन्यांत जवळपास दोनवेळा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले. आता मागील 15 दिवसात कच्चे तेल पुन्हा स्वस्त झाले. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरणीची अपेक्षा आहे.
 

वेबदुनिया वर वाचा