पेट्रोल 1.09 रुपे स्वस्त; डिझेल 56 पैशांनी महाग

शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (10:12 IST)
पेट्रोलच किमतीत गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रतिलिटर 1.09 रुपे कपात करणत आली आहे. डिझेलच किमतीत 56 पैसे वाढ करणत आली आहे.
 
इंडिन ऑईल कार्पोरेशनने हा निणर्य गुरुवारी जाहीर केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरात झालेली घसरण आणि रुपया वधारल्यामुळे  पेट्रोलचे भाव कमी करण्यात आले आहेत. गेल्या साडेतीन महिन्यतील पेट्रोलच्या दरातील ही दुसरी घट आहे.
 
विनाअनुदानित गॅस सिलिंडर 2.50 रुपे स्वस्त करण्यात आले आहे. 16 एप्रिल रोजी पेट्रोल 70 पैसे स्वस्त झाले होते. डिझेलची भाववाढ झालेली असली तरी अद्याप तेल कंपन्यांना प्रतिलिटर 1.33 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आणखी तीन महिने डिझेलची दरमहा 50 पैसे भाववाढ चालू राहण्याची शक्यता आहे.
 
गतवर्षी जानेवारी महिन्यापासून सरकारने तेल कंपन्यांना डिझलचे भाव दरमहा 50 पैसे वाढविण्यास परवानगी दिली होती. आतापर्यंत  डिझेलच भावात 18 वेळा वाढ झाली असून 11.24 रुपये प्रतिलिटर दर वाढले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा