पेट्रोलच्या दरात 58 पैशांनी वाढ, डिझेल 31 पैसे स्वस्त

शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (11:20 IST)
नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा बदलल्या आहेत. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात 58 पैशांनी वाढ झाली असून डिझेलचे दर मात्र 31 पैशांनी कमी झाले आहेत. एकाच महिन्यात पेट्रोलच्या दरात दुसर्‍यांदा वाढ झाली आहे. 
 
सप्टेंबरच्या एक तारखेला पेट्रोलचे प्रतिलिटरमागे दर 3 रुपये 38 पैशांनी वाढले होते. तर डिझेलचे दरही 2 रुपये 37 पैशांनी वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांमुळे नागरिकांना पुन्हा पेट्रोलच्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा