पहिल्या बुलेट ट्रेनला जपानचा ‘धक्का’

शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2015 (10:19 IST)
मुंबई ते अहमदाबाद ही भारतामधील पहिली ‘बुलेट ट्रेन’विकसित करण्यासाठी जपानकडून कमी व्याजात कर्ज मिळणार आहे. 
 
भारतीय रेल्वे बोर्डचे अध्यक्ष एक के मित्तल म्हणाले, अतिजलद रेल्वे बांधणीसंदभार्तील तंत्रज्ञानाचे काही प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आले आहेत. मात्र जपानचा प्रस्ताव तंत्रज्ञान व अर्थसहाय्य या दोन्ही घटकांचा समावेश असलेला एकमेव प्रस्ताव आहे. ‘डायमंड क्वाड्रिलॅटरल’या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांना जोडणारे; सुमारे १० हजार किमी अंतराचे खास ‘बुलेट ट्रेन नेटवर्क’विकसित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा