दसर्‍याच्या तोंडावर सोने उतरणार

सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (09:45 IST)
नवी दिल्ली- परदेशात सोन्याच्या भावात तेजी असताना अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात 110 रुपयांची कपात दिसून आली. सोन्याचे भाव 110 रुपयांनी खाली आल्यानंतर सोने 26 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.
 
मात्र दिवाळीचा सण असल्याने नाणे बनवणार्‍यांकडून चांदीची मागणी असल्याने चांदीच्या भावात सुधार झाला आहे. 
 
सराफा व्यापार्‍यांच्या मते सध्या आभूषण विक्रेत्यांकडून मागणी घटली आहे आणि रुपया मजबूत झाल्याने आयातही स्वस्त झाली आहे. यामुळे काही महाग धातूंची किंमतींवर परिणाम झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा