..तर 2000 रुपयांनी स्वस्त होईल सोने

सोमवार, 14 सप्टेंबर 2015 (10:01 IST)
नवी दिल्ली/जयपूर- पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे लक्ष 16 ते 17 सप्टेंबरला होणार्‍या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.
 
तज्ज्ञांच्या मते असे झाल्यास घरगुती बाजारात सोन्याचे दर 2000 रुपयांनी कमी होईल.
 

वेबदुनिया वर वाचा