डाळीचे भाव 200 रुपये प्रति किलो!

शुक्रवार, 17 जून 2016 (11:58 IST)
डाळीचे भाव जवळपास 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचले आहे. अतिरिक्त साठ्याची क्षमता 5 टक्क्यांनी वाढवून 8 लाख टन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

डाळ साठवणूकीची मर्यादा आतापर्यंत 1.5 टन एवढी होती. किरकोळ विक्री करण्यासाठी ही डाळ राज्यांना देण्यात येत होती. ग्राहक मंत्रालयाच्या आकड्यांनुसार सध्या उडीद डाळ 196, तुर डाळ 166, मूग डाळ 120, मसूर डाळ
105 आणि हरभरा डाळ 105 रुपये प्रति किलो आहे. केंद्राच्या नवीन साठवणुकीच्या नियमानुसार डाळ थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे.

ही डाळ राज्यांना पुरवण्यात येणार असून ग्राहकांना 120 रुपये प्रति किलोच्या भावाने विक्री करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा