'टाटा जेस्ट' लवकरच लाँच

गुरूवार, 31 जुलै 2014 (14:23 IST)
टाटा मोटर्सची टाटा जेस्ट ही कार लवकरच लाँच होणार आहे. ही कार लाँच होण्याअगोदरच तिचे बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने ऑनलाइन बुकिंगबरोबरच डिलरशिप देण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे.
 
टाटा जेस्ट ऑगस्ट महिन्यात लाँच होणार असून 21 हजार रुपयात फ्री बुकिंग कंपनिने सुरू केले आहे. या बुकिंगसाठी डेबिड आणि क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कंपनिने या कारच्या प्रमोशनसाठी शॉपिंग कॉम्पलेक्सपासून मॉलपर्यंत चर्चा सुरू आहे. या कारची किंमत इंडिगो ई-एस आणि मांझा या कारच्या दरम्यान असणार आहे. ही कार होंडा अमेझ एक्स्टे आणि डिझायर या गाड्यांशी स्पर्धा करणार आहे. या कारची संभाव्य किंमत साडेचार लाख ते सात लाख रूपयांच्या दरम्यान असून या गाडिचे वेध लागले आहेत.  

वेबदुनिया वर वाचा