गुंतवणुकीसाठी भारत सर्वोत्तम देश

WD
एफडीआय नियमावलीत सूट दिल्यानंतर आता भारत विदेशी गुंतवणूकदारांना सर्वाधिक आकर्षित करणारा देश ठरला आहे. कारण नव्या नियमावलीनुसार भारत गुंतवणुकीसाठी सर्वांत सुरक्षित देश असल्याचे ग्लोबल सव्र्हे फर्म अन्स्ट्र अ‍ॅण्ड यंग (ईवाय) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

विशेष म्हणजे भारताने चीन आणि अमेरिका या सारख्या आघाडीच्या देशांना मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात भारताला अ‍ॅट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हटले आहे. या यादीत भारतानंतर ब्राझील आणि चीनचा दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो, तर कॅनडाचा चौथा आणि अमेरिकेचा पाचवा क्रमांक आहे.

ग्लोबल सव्र्हे फर्म अन्स्ट्र अ‍ॅण्ड यंगच्या म्हणण्यानुसार रुपयाचे अवमूल्यन आणि एफडीआयसाठी अनेक क्षेत्रे गुंतवणुकीसाठी खुले झाल्याने भारत विदेशातील गुंतवणुकीसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. याचा फायदा भारताला तर होणार आहेच. शिवाय गुंतवणूकदारांसाठीही ते फायदेशीर ठरणार आहे.

गुंतवणूकदारांचे आकर्षण
आणि देशांचा क्रमांक
भारत आघाडीवर, ब्राझील, चीन, कॅनडा, अमेरिका, द. आफ्रिका, व्हियतनाम, म्यानमार, मॅक्सिको, इंडोनेशिया हे पहिल्या दहा देशांची नावे आहेत.

वेबदुनिया वर वाचा