एनआरआई असेल टाटांचा उत्तराधिकारी

रतन टाटांनंतर कोण? याचा शोध घेतला जात असतानाच आता टाटा ग्रुपचे अध्यक्ष स्वतः रतन टाटा यांनी तो भारतीय असेल तर छानच परंतु तो अनिवासी भारतीय अर्थातच एनआरआई असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

माझ्यानंतर कोण याचा शोध घेतला जात आहे. ती व्यक्ती भारतीय असेल तर कंपनीसाठी चांगलेच आहे, परंतु तो जर अनिवासी भारतीय असेल तर कंपनीसाठी ते जास्त चांगले असल्याचे टाटांनी म्हटले आहे. कंपनीचा 65 टक्के व्यवसाय हा विदेशात असल्याने आपण यावर अधिक भर देत असल्याचे टाटा म्हणाले.

75 व्या वर्षी आपण सेवानिवृत्त होणार असून, टाटा उद्योग समूहासाठी नवीन नेतृत्वाचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा