'एअरसेल'ची 'फोर जी' सेवा सुरु

मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (17:36 IST)
एअरसेल नेटवर्क कंपनीने तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये आपली 'फोर जी' सेवा सुरू केली आहे. यापूर्वी एअरसेलने 'टू जी' आणि 'थ्री जी'सेवा सुरु केली होती. टू जी, 'थ्री जी' आणि 'फोर जी' या तीनही सेवा पुरविणारी 'एअरसेल' ही एकमेव खासगी नेटवर्क कंपनी ठरली आहे. 
 
तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये 'फोरजी' सेवा सुरू झाली आहे. यापूर्वी आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि ओडिसामध्ये फोर जी सेवा सुरू केल्याचे 'एअरसेल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम वासुदेव यांनी म्हटले आहे. 
 
'एअरसेल'कडे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम, ईशान्य आणि जम्मू काश्मीर या राज्यांत 20 मेगाहर्टझ स्पेक्ट्रम आहे. या स्पेक्ट्रम चा उपयोग फोर जी सेवांसाठी होतो. 

वेबदुनिया वर वाचा