उद्या नियोजन आयोगाची पहिली बैठक

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाची पहिली बैठक उद्या (एक सप्टेंबर) रोजी राजधानी दिल्लीत होणार आहे.

आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेक सिंह अहलुवालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 व्या पंचवार्षिक योजनेविषयी सरकारला माहिती देण्यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर यात चर्चा करण्यात येणार असून, मंदीतून मार्ग काढण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा