इलेक्टशन गिफ्ट: पेट्रोल 70 पैशांनी झाले स्वस्त

बुधवार, 16 एप्रिल 2014 (12:49 IST)
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सावरणारा भारतीय रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलच्या कमी झालेल्या किंमतीमुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 70 पैशांनी कपात करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे . नवे दर मंगळवारी  मध्यरात्रक्षपासून लागू करण्‍यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आयात स्वस्त झाल्याचा परिणाम म्हणून पेट्रोल प्रतिलिटर 70 पैशांनी स्वस्त करण्‍यात आले आहेत.

भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 61.44 वरून 60.50वर आला आहे. त्यामुळे रुपया सावरल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच इंधन तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरही प्रतिबॅरल 118.09 डॉलरवरून 115.73 डॉलरपर्यंत उतरले आहेत. या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून मंगळवारी पेट्रोलचे दर कमी करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा