अखेर सराफ नमले; संप स्थगित

मंगळवार, 12 एप्रिल 2016 (10:50 IST)
अगदी गुढीपाडव्यालाही बंद ठेऊन मागील दीड महिन्यांपासून निषेधाची गुढी उभारणार्‍या सराफांना सरकाने शेवटपर्यंत न जुमाल्याने अखेर सराफांनीच नमती भूमिका घेत संप स्थगित केला आहे.
 
अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुकारलेला बेमुदत बंद मागे घेण्याचा निर्णय सराफी संघटनांनी घेतला असून गुरुवारपासून दुकाने उघडली जाणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने येत्या २४ तारखेपर्यंत मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा सोन्या-चांदीची दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.  मागील आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत देशभरातील सराफी संघटनांच्या निवडक प्रतिनिधींची अ‍ॅक्शन कमिटी स्थापन करून त्यांना निणयार्चे सर्वाधिकार देण्यात आले. या कमिटीने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून दुकाने उघडली जाणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा