साईबाबांचा आशिर्वाद

WD
अंगात देवी येणं, भक्‍ताकडून वेगवेगळे चमत्‍कार करवून घेणं, यासारख्‍या घटना भारतात नव्‍या नाहीत. मात्र एखाद्या महिलेच्‍या अंगात शिर्डीवाले साईबाबा आल्याचं आणि आपल्‍या भक्‍तांची दुःखं दूर केल्‍याचं तुम्‍ही कधी ऐकलयं? नसेल ऐकलं कदाचित. पण देवासच्‍या साईमंदिरात असं घडतयं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला या साईमंदिरातील अशाच एका महिलेविषयी माहिती देणार आहोत. गेल्या 15 वर्षांपासून बाबांच्या माध्यमातून भाविकांच्या समस्या दूर करत असल्याचा या महिलेचा आणि तिच्‍या भक्‍तांचा दावा आहे.

WD
देवासच्‍या साईमंदिरात पुजारी म्‍हणून काम करीत असलेल्या श्रीमती इंदूमती यांच्‍या स्‍नुषा आशा तुरकणे यांच्‍या माध्‍यमातून साईबाबा आपल्‍या भक्‍तांची दुःखे दूर करतात. दर गुरुवारी आशा यांच्या अंगात साईबाबांचा प्रवेश होत असल्‍याची भाविकांची धारणा आहे. गुरुवारी रात्री त्या पुरुषी आवाजात संवाद साधतात. आणि सिगारेट पीत आपल्या भक्तांच्या समस्या ऐकून त्या सोडवतातही. त्यांनी दिलेली प्रत्येक सुचना भाविक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळतात.

रघुवीर प्रसाद या भाविकाने आपल्या अनुभवांविषयी सांगितलं, की आपली बाबांच्या चमत्कारावर प्रचंड श्रद्धा आहे. ते कोणत्याही रुपात आले तरीही ते मला पुजनीयच असल्‍याचे प्रसाद यांचं म्हणणं आहे.

WD
गेल्या 10 वर्षांपासून मी सातत्याने इथं येतो. मंदिरात आल्यानंतर मनःशांती मिळते, असं मंदिरात येणार्‍या आणखी एका भाविकानं सांगितलं.
बंधुभाव, समता आणि मनुष्‍य सेवेची शिकवण साईबाबांनी दिली. कोणत्याही गोष्टीवरची श्रद्धा आणि सबुरी अर्थात संयम हेच जगण्याचं खरं सूत्र असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 'सबका मालिक एक है' असं स्पष्ट करतानाच देवावर केवळ विश्वास असू द्या. मग तुम्ही कुठल्‍या मंदिरातही गेला नाहीत तरी चालेल. असही बाबा सांगायचे. मात्र आता एका महिलेल्या अंगात चक्क बाबांचा प्रवेश होतो, हे खरं असू शकतं? आपल्याला काय वाटतं? हा श्रद्धेचा विषय आहे की निव्‍वळ अंधश्रद्धा. खरं तर हा वादाचा विषय होईल. मात्र निर्णय तुम्‍ही घ्‍यायचाय. हं... आपले विचार मात्र आम्हाला जरुर कळवा.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा