रात्री यापासून राहा लांब

शास्त्रांप्रमाणे सुख, शांती आणि समृद्धीसाठी काही नियम निश्चित केलेले आहेत. यात कोणते काम कोणत्यावेळी करायला नको याबाबत माहीत दिलेली आहे. पाहू या विष्णू पुराणानुसार अश्या 3 गोष्टी ज्या रात्रीच्यावेळी टाळाव्या:


 
स्मशानात जाणे
रात्रीच्या वेळी स्मशानात तर काय त्याच्या ओवती-भोवतीदेखील जाऊ नये. स्मशानात नेहमी नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते ज्याच्या परिणाम आमच्या मन आणि मेंदूवर पडतो. याव्यतिरिक्त तेथे जळत असलेल्या मृतदेहांतून बाहेर पडणारा धूरदेखील आरोग्यासाठी नुकसानदायक असतो. तिथे अनेक सूक्ष्म जिवाणू देखील पसरलेले असतात म्हणूनच स्मशानातून आल्यावर अंघोळ करण्याची परंपरा आहे. आणि रात्री अंघोळ करण्याने आरोग्यावर विपरित परिणाम पडतात. या सगळ्या कारणांमुळे रात्री स्मशानाच्या जवळपास जाऊ नये.

चौरस्त्यावर जाणे
समजूतदार लोकांनी रात्रीच्या वेळी चौरस्त्यावर जाणे टाळावे. यावेळी पुष्कळदा काही अजाराने किंवा इतर गोष्टींमुळे त्रासलेले लोकं चौरस्त्यावर टोटके करून टरबूज, लिंबू किंवा इतर काही वस्तू ठेवून जातात. ते ओलांडणे बरे नव्हे. याव्यतिरिक्त रात्री चौरस्त्यावर गुंड लोकं सक्रिय असतात. अशात सज्जन लोकांनी तिथून निघणे त्रासदायक ठरू शकतं. सज्जन लोकांनी रात्री आप आपल्या घरात राहावे.


वाईट वृत्तीच्या लोकांबरोबर जाणे
तसे तर वाईट वृत्तीच्या लोकांशी सदैव दूर राहावे पण रात्रीच्या वेळी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. असे लोकं वाईट आणि अधार्मिक कार्यांमध्ये लिप्त असतात आणि मुख्यतः गुन्हा अंधारात घडले जातात. अशात एखादा सज्जन या लोकांसोबत असल्यास तोही संकटात सापडू शकतो.

वेबदुनिया वर वाचा