लहानपणापासून आपण मोठ्याकडून कित्येक नियम ऐकले असतील, कदाचित काही नियमांना विसरही पडला असेल तर आठवू मोठ्यांनी सांगितलेले काही नियम ज्यांच्यामागे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणंही लपलेली आहेत:
* सायंकाळी केर काढू नये.
* संध्याकाळी घरची दारे बंद ठेवू नयेत.
* रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसर्यास देऊ पण नयेत.
* रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
* दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
* निजलेल्या माणसाला कधीही ओलांडून जाऊ नये.
* उंबरठ्यावर बसून शिंकू नये.
* अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
* घरातून निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.