काठीने पाणी शोधणारा अवलिया

WD
काठी आणि नारळ यांच्या सहाय्याने जमिनीतली पाण्याची पातळी शोधणारा एक अवलिया मध्य प्रदेशातील इंदूर शहरात रहातो. श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही या व्यक्तीचीच भेट तुमच्याशी घडविणार आहोत. या व्यक्तीचं नाव आहे गंगा नारायण शर्मा.

जमिनीच्या कोणत्या भागात पाणी आहे याची अचूक माहिती आपण देतो, असा शर्मा यांचा दावा आहे. पाण्याचा शोध घेण्याची त्यांची विशिष्ट पद्धत आहे. इंग्रजीतील Y आकाराची काठी आणि नारळ या दोन साधनांच्या सहाय्याने ते पाण्याचा शोध घेतात. ही काठी दोन्ही हातांमध्ये ठेवून ते जमिनीच्या चारही बाजूला पाण्याचा शोध घेतात. ज्या ठिकाणी काठी आपोआप फिरायला लागते तिथे पाणी असल्याचा दावा शर्मा करतात. या प्रक्रियेला ते डाऊजिंग तंत्रज्ञान असं म्हणतात. या पद्दतीनुसार जमिनीत पाणी सापडण्याची शक्यता ८० टक्के असल्याचे ते सांगतात.

WD
काठीशिवाय नारळाचा उपयोगही पाणी शोधण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेत नारळ हातावर ठेवतात. जिथे पाणी असेल तिथे नारळ आपोआप उभा राहतो. तिथे पाणी असते, असा शर्मा यांचा दावा आहे.

येथील बांधकाम व्यावसायिक शर्मा यांच्या विद्येचा उपयोग करून बोअरवेल खणतात. शर्मा यांच्याकडे असलेल्या या विद्येमुळे पैशाची बचत होते, असे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शर्मा यांचा दावा प्रत्येकवेळी खरा ठरतो, असेही नाही. अनेकवेळा शंभर ते दीडशे फूटांपर्यंत पाणी लागेल असे सांगितले जाते. पण 400 फूट खोदले तरीही पाणी लागत नाही. पण तरीही लोकांचा शर्मा यांच्यावरील विश्वास कायम आहे.

WD
दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासत आहे. बोअरवेल खोदण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे शर्मा यांच्या विद्येने पाणी आले तर बिघडले कुठे असा सवाल रोहित खत्री करतात. थोडक्यात शर्मांवर लोकांचा विश्वास आहे. कारण, पाणी लागल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो, असा त्यांचा बिनतोड सवाल आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा