कित्येकदा रस्त्यावरून जाताना चौरस्त्यावर अर्धा कापलेला किंवा सुई टोचलेला लिंबू दिसतो किंवा एखाद्या लाल कापडात गुंडाळलेला असतो. अशावेळी सावध राहून रस्त्यावर पडलेला लिंबू ओलांडू नाही कारण की तो मंतरलेला असून तिथे ठेवण्यात आलेला असू शकतो. जसे की घरातील समस्या, असाध्य रोग किंवा प्रेतबाधा संबंधी तक्रारीपासून मुक्तीसाठी. म्हणून आपल्या रस्त्यावर किंवा चौरस्त्यावर लिंबू दिसल्यास तेथून सांभाळून निघा. त्याला ओलांडून जाण्याची चूक अजिबात करू नये.
जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेत बाधाचा प्रभाव होतो, तेव्हा ते उतरविण्यासाठी लिंबू वापरला जातो. यानंतर हा लिंबू एखादा चौरस्त्यावर फेकण्यात येतो. यामागील कारण मानले आहे की जो कोणी या लिंबावर पाय देईल किंवा त्यावरून आपले वाहन नेईल अर्थात त्याला ओलांडेल तेव्हा ज्या व्यक्तीसाठी लिंबू ठेवण्यात आला आहे त्याची बाधा दूर होऊन ज्याने तो ओलांडला असेल त्यावर परिणाम होईल. म्हणूनच रस्त्यावरील लिंबू कधी ओलांडू नये.