एका स्वप्नाने बदलले तिचे जीवन

WD
आतापर्यंत तुम्ही अनेक चमत्कार पाहिले आणि ऐकले असतील, परंतु एखादे स्वप्न कुणाचे आयुष्य बदलू शकते असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला अशाच एका स्वप्नाळू मुली विषयी माहिती देणार आहोत. ज्या मुलीने अनेक स्वप्न पाहिली. इतरां प्रमाणे चालण्याची, लहान वयात बागडण्याची, पण तिची सारी स्वप्न अपूर्णच राहिली. अचानक एका रात्री तिला असे एक स्वप्न पडले की ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलून गेले.

राजस्थानमधील महान संत बाबा रामदेवजी हे या मुलीच्या स्वप्नात आले होते असे या मुलीचे म्हणणे आहे. यानंतर या मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडले. ज्या मुलीला लहानपणापासून अपंगत्व होते, ति मुलगी अचानक चालायला लागली. मध्य प्रदेशातील हाटपीपल्या गावात रहाणाऱ्या बबिताच्या बाबतीत हे सारे घडले. बाबांनी स्वप्नात आल्यानंतर आपल्याला, उठ आणि चालायला लाग असा आशीर्वाद दिल्याचे तिचे म्हणणे आहे. यानंतर बबितातही चमत्कारिक शक्ती आल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.

आपला हात गेल्या अनेक दिवसांपासून दुखत होता, परंतु बबिताकडे आल्यानंतर आता आपल्याला फरक जाणवत असल्याचे विजयचे म्हणणे आहे.

WD
आपल्याला पाठीचे दुखणे होते. अनेक दिवसांपासून आपल्याला याचा त्रास होत आहे. बबिताच्या उपचारांविषयी माहिती मिळाल्यानंतर आपण येथे आलो आणि येथे मालीश केल्यावर आता आपल्याला फरक जाणवत असल्याचे विजयचे म्हणणे आहे.

बबिताला लहानपणापासूनच त्रास होता. तिला चालता येत नव्हते. परंतु तिला बाबा रामदेव यांनी स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर आता ती घरातील सर्व कामं स्वतः: करते. गहू निवडणे, भांडी घसणे, कपडे धुणे ती स्वतः: करत असल्याची माहिती गावकरी महिला देतात.