या दरम्यान अशी घटना घडली की कुत्र्याला श्राप मिळाला. असे म्हणतात की पांडव द्रौपदीच्या कक्षात जाण्यापूर्वी आपल्या चरण पादुका खोलीच्या बाहेर काढायचे ज्याने दुसरे कोणी आत प्रवेश करू नये. परंतू एकदा अर्जुन आपल्या पादुका बाहेर काढून द्रौपदीसह प्रेम प्रसंगात लीन होते तेव्हा तिथे एक कुत्रा आला आणि त्याने अर्जुनाची पादुका उचलून खेळत-खेळत जंगलाकडे घेऊन गेला. त्या दरम्यान भीम आपल्या कक्षाकडे जात होता. द्रौपदीच्या कक्षाबाहेर पादुका नाही हे बघून त्याने खोलीत प्रवेश केला. अशा अवस्थेत असताना द्रौपदीला भीमाला बघून लाज वाटली आणि क्रोधित होऊन त्याला प्रवेश करण्याचे कारण विचारले.
यावर भीम ने स्पष्टीकरण दिले. नंतर दोघे भाऊ पादुकांच्या शोधात निघाले आणि जंगलात पोहचल्यावर कुत्र्याला पादुकांशी खेळताना बघितले. या प्रकरणामुळे द्रौपदी लज्जित झाली होती म्हणून तिने रागात कुत्र्याला श्राप दिला की जसे आज मला संभोग करताना तिसर्या व्यक्तीने बघितले तसेच तुला संभोग करताना पूर्ण दुनिया बघेल. तेव्हापासून कुत्रे संभोग करताना लोक लाजेची काळजी बाळगत नाही असे मानले आहे.