आज आम्ही आपल्याला चण्याचे काही ज्योतिषी टोटके अर्थातच उपाय सांगत आहोत ज्याने आपण आपल्या जीवनातील संकट दूर करून सुख समुद्धी प्राप्त करू शकता.
नवर्याला वळणावर आणण्यासाठी: जर आपला नवरा इतर कोणत्या स्त्रीच्या मागे असेल किंवा तिच्यासाठी आपला अपमान करत असेल तर गुरुवारी 300 ग्राम बेसनाचे लाडू, कणकेचे दोन पेढे, तीन केळी, आणि चण्याची ओली डाळ अश्या गायीला खाऊ घाला जी आपल्या वासराला दूध पाजत आहे. गायीला प्रार्थना करा की आपल्या अपत्याला फल दिले आपण माझ्या अपत्याला फल द्या. काही दिवसातच आपला नवरा वळणावर येईल.
विवाह हेतू: विवाह जमत नसल्यास चण्याच्या डाळीत गूळ मिसळून गायीला खाऊ घाला. असे किमान 11 गुरुवार केल्याने इच्छा पूर्ण होईल.
सुख शांती हेतू: घर किंवा व्यापार स्थळाचे प्रमुख दाराच्या एका कोपरा गंगाजल ने धुवा, तिथे स्वस्तिकाची स्थापना करा आणि त्यावर रोज चण्याची डाळ आणि गूळ ठेवून पूजा करा. ते खराब झालं असं वाटत असल्यास सर्व सामुग्री एकत्र करून पाण्यात प्रवाहित करा. ही क्रिया शुक्ल पक्षाच्या बृहस्पतीवारी आरंभ करून 11 गुरुवारपर्यंत नियमित करा.
व्यवसायात लाभ हेतू: शुक्रवारी रात्री सव्वा किलो चण्याची डाळ भिजवून द्या. दुसर्या दिवशी अर्थात शनिवारी ती मोहरीच्या तेलात बनवून त्याचे तीन भाग करा. त्यातून एक भाग घोड्याला किंवा म्हशीला खाऊ घाला. दुसरा भाग कुष्ठ रूग्णाला द्या आणि तिसरा भाग आपल्या डोक्यावरून (घडीच्या सुईच्या विपरित दिशेत) तीनदा ओवाळून चौरसत्यावर ठेवून द्या. 40 दिवस ही क्रिया करा.
नवग्रह शांती हेतू: ग्रहांचा समस्येने त्रस्त असाल तर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाच्या मंदिरात चण्यात गूळ घालून प्रसाद वाटावा. तिथे बसून हनुमान चालीसाचा पाठ करावा.
प्रेतबाधेपासून बचावासाठी: जादू टोने आणि प्रेतबाधा पासून मुक्तीसाठी शुक्रवारी काळ्या घोड्याला 1 किलो चणे खाऊ घालावे.
सुख-समृद्धी हेतू: गहू दळवताना त्याबरोबर 100 ग्राम काळे चणे दळवावे. दळवण्याचे काम शनिवारी करावे. शनिवारी काळे चणे आहारात सामील करावे.
धन समृद्धी हेतू: गुरुवारापासून सुरू करून पिंपळाच्या मुळात पाणी, चण्याची डाळ आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावे. सात गुरुवार आपल्या गुरू बृहस्पतीच्या पूजेत अर्पण केलेली चण्याची डाळ घोड्याला खाऊ घालावी.
शनिदोषहून मुक्तीसाठी: शुक्रवारी रात्री काळे चणे भिजत घालावे. शनिवारी हे चणे, कच्चा कोळसा, हलकी लोखंडाची पान एका काळ्या कापडात बांधून मासोळ्याच्या तलावात टाकून द्यावे. हा उपाय एक वर्ष करा. या दरम्यान चुकूनही मासोळीचे सेवन करू नका.
रोजगार वृद्धी हेतू: शुक्रवारी भाजलेले चणे, गूळ आणि आंबट-गोड गोळ्या मिसळून 8 वर्षच्या आत वय असलेल्या मुलांमध्ये वाटावे. सतत सात शुक्रवार असे केल्याने रोजगारामध्ये वृद्धी होईल.