शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म केल्यास वाईट फल प्रदान करतात. शनिवार हा दिवस शनि देवाचा मानला गेला आहे. आणि जर कुंडलीत शनिदोष असेल तर त्या व्यक्तीने शनिवारी काही पदार्थ असे आहेत जे खाणे टाळावे. अर्थातच शनिदेवाला खूश करायचे असेल तर शनिवारी हे पदार्थ खाऊ नये. कोणते आहे ते पदार्थ बघू या:
शनिवारी लाल मिरची वापरू नये. याने शनि देव नाराज होतात.
तसेच शनिवारी चणे, उडद आणि मूग डाळ खायला हरकत नाही परंतू मसूर डाळ खाणे टाळावे. कारण ही डाळ मंगळ प्रभावित आहे आणि याने शनिची क्रूर नजर वाढते.