सौंदर्याचा खरा मित्र दही

NDND
दही स्वास्थ्यासोबतच सौंदर्य निखारण्यातही महत्त्वाचे स्थान आहे. हे एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे सौंदर्य प्रसाधन आहे. दही चेहरा, मान यांचे सौंदर्यात निखार आणतोच, त्या सोबतच केसांना पोषण देण्यातही फारच लाभकारक ठरते. चला तर पाहू या दह्याचा उपयोग करून कशाप्रकारे केसांचे सौंदर्य वाढू शकते आणि शूष्क त्वचेलाही सुंदर बनवू शकते.

* वेग-वेगळे शांपू आणि रंगांचा वापर केल्याने केसांची चमक कमी झाली असेल तर घाबरू नका दह्यात बेसन मिळवून केसांना मुळापासून लावा. आणि एका तासाने केस धुवून घ्या. त्यामुळे केसांची चमक परत येईल आणि त्यातील डेंड्रफ देखील कमी होईल.

* केसांमध्ये डेंड्रफ असल्यास दह्यात मिरेपूड मिळवून केस धुवा. आठवड्यातून हे दोनदा जरूर करा. त्यामुळे केसांमधील डेंड्रफ नाहीसा होऊन केस मुलायम, काळे, लांब आणि दाट होण्यास मदत होईल.

* चेहर्‍यावर पूरळ येत असल्याने त्रासले असाल तर आपल्या चेहर्‍यावर आंबट दह्याचा लेप लावा. आणि चेहरा वाळल्यावर धुवून घ्या. थोड्याच दिवसात तुम्हाला अप्रत्यक्षित लाभ होईल.

*मानेच्या मागील भाग काळा पडला असेल तर स्नान करताना मानेवर आंबट दह्याने मालिश करा.

*बर्‍याच महिला केस गळंतीने त्रासलेल्या असतात. अशात एक वाटी आंबट दही, चार चमचे मुलतानी माती, चार चमचे शिकेकाई पावडर, अर्धा लिंबूरस, चार चमचे त्रिफळाचूर्ण हे मिश्रण द्हयात रात्री भिजवा आणि सकाळी मुळापासून लावून एक तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा अवश्य करा.

*वाढत्या वयासोबतच चेहर्‍याची त्वचा शूष्क व्हायला लागते. अशा वेळी शूष्क त्वचा परत चमकविण्यासाठी अर्धा कप गव्हाचा कोंडा, पाच चमचे दही आणि काही थेंब सरसोचे तेल टाकून पेस्ट बनवून घ्या. चेहरा, मानेला लावा. पंधरारवीस मिनिटांनी वाळल्यावर पाण्याने धुवून घ्या.

*चेहर्‍याची त्वचा साफ करण्यासाठी एक चमचा दह्यात दोन चमचे मुलतानी माती टाकून पेस्ट बनवा. आणि चेहर्‍यावर लावून वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्या.

*दह्यात बेसन पीठ आणि गुलाब जल टाकून लेप तयार करा. आणि चेहरा आणि मानेला लावा. वाळल्यावर रगडून काढा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. नियमितपणे केल्याने तेलकट त्वचेचा अतिरिक्त तेलकटपणा नाहीसा होऊन तुमची त्वचा सतेज वाटले.
वरील टिप्सचा वापर करून आपल्या केस आणि शुष्क त्वचेची काळजी घ्या.

वेबदुनिया वर वाचा