Vitamin E for Hair व्हिटॅमिन-ई केसांच्या वाढीपासून ते शाईनी होण्यासाठी उपयुक्त, केसांची गुणवत्ताही सुधारेल

शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (16:17 IST)
हिवाळ्यात केसांच्या समस्या अनेकदा वाढतात. अशा परिस्थितीत केसांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक होते. आता केसांचा विचार केला तर व्हिटॅमिन ई चे नाव नक्कीच येतं. व्हिटॅमिन ई तेल त्वचा, नखे आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे अनेक समस्यांना तोंड देण्यास मदत करतात.
 
व्हिटॅमिन ई मृत त्वचा काढून टाकून लवकर नवीन त्वचा आणण्यास मदत करते. दुसरीकडे, खराब केस दुरुस्त करण्याच्या बाबतीत, ते केसांना अँटिऑक्सिडंट्स देऊन चमकदार बनविण्यास मदत करते. तर जाणून घ्या केसांच्या वाढीसोबत व्हिटॅमिन ईचे फायदे- 
 
कसे वापरायचे
बाजारात उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये छिद्र करा आणि सर्व तेल काढा. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. त्यानंतर सकाळी उठून केस धुवा. महिनाभर असे केल्याने केस चांगले होतील. कारण याच्या मदतीने केसांना पोषक तत्त्वे मिळतात.
 
केसांसाठी ते कसे फायदेशीर आहे?
 
1) केस गळण्याचे कारण अनेकदा तणाव असतो. अशा स्थितीत व्हिटॅमिन ई केसांना अँटिऑक्सिडेंट देते. ज्याच्या मदतीने तणावामुळे निर्माण होणाऱ्या विषाचा प्रभाव कमी होतो. नियमित वापराने, रक्ताभिसरण आणि हृदयाचे ठोके योग्यरित्या कार्य करतात आणि आपण निरोगी राहतात.
 
2) जर तुमचे केस वाढणे थांबले असेल तर तुम्ही व्हिटॅमिन ई वापरू शकता. व्हिटॅमिन ई कमकुवत केसांना पोषक तत्त्वे पुरवते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करते. वाढ वाढवण्यासाठी खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई जेल मिसळा आणि ते टाळूमध्ये चांगले लावा.
 
3) वय नसतानाही केस पांढरे होत असले तरी व्हिटॅमिन ई लावू शकता. जेव्हा अँटिऑक्सिडंट्सला नुकसान होतं तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. केस पांढरे होऊ नयेत यासाठी आठवड्यातून दोनदा व्हिटॅमिन ई तेलाने केसांना मसाज करा.
 
4) केसांना नियमितपणे व्हिटॅमिन ई तेल लावल्यास केसांना डीप कंडिशनिंग मिळते. जे केसांना पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती