* केळीचे साल - चकाकती त्वचा पाहिजे असल्यास दिवसातून 5 मिनिट केळीचे साल चेहऱ्यावर चोळा. केळीच्या सालात अनेक गुण आढळतात. या मध्ये व्हिटॅमिन बी 6 ,बी 12, कार्बोहायड्रेट आणि अँटी ऑक्सीडेन्ट आढळतात. जे चेहऱ्यावरील मृत त्वचेला काढून टाकतात.
* डाळिंबाचे साल- डाळिंबाचे साल तव्यावर भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट दिवसातून किमान एकदा तरी चेहऱ्यावर लावा. असं केल्याने त्वचेवरील मुरूम, सुरकुत्या आणि मृत त्वचा नाहीसे होतात कारण डाळिंबात अँटीऑक्सीडेंट आढळतात या मुळे त्वचा चमकदार दिसते.