चेहऱ्यावर वाफ घेतल्याने चेहरा स्वच्छ होतो. ब्लॅक अँड व्हाईट हेड्सपासून सुटका मिळते. त्वचेच्या छिद्रांमध्ये लपलेली घाण अगदी सहजतेने काढून टाकण्यातही ते प्रभावी ठरते. फेस स्टीमिंगमुळे तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक चमकतोच शिवाय ताजेपणाही येतो. आज आम्ही तुम्हाला वाफ कशी घेऊ शकता आणि त्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत.
वाफ घेतल्याने मुरुम आणि सुरकुत्याही दूर होतात.
त्वचेचा ओलावाही संतुलित राहतो, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसत नाही.