हिवाळ्यात संत्र्याच्या सालांनी घ्या त्वचेची काळजी

बुधवार, 30 डिसेंबर 2020 (17:42 IST)
हिवाळ्याच्या काळात त्वचेची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे. या हंगामात त्वचा रुक्ष कोरडी आणि निर्जीव होते. या शिवाय चेहऱ्याची चमक आणि सौंदर्य देखील कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत लोक विविध प्रकाराच्या पद्धती अवलंबवतात. काही लोक महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात तर काही लोक शस्त्रक्रिया करवतात. तर सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी सर्वोत्तम मानले आहे. 
 
त्वचेचे तज्ज्ञ म्हणतात की संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. म्हणून हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. संत्र्याचे साल देखील त्वचेसाठी फायदेशीर होऊ शकतो. या मध्ये असलेले कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटी बेक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या बऱ्याच समस्यांना दूर करण्यात उपयुक्त आहे. हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेशी निगडित त्रासाला संत्र्याच्या सालीने दूर केले जाऊ शकते. आज आम्ही सांगत आहो की संत्र्याच्या सालीच्या साहाय्याने हिवाळ्यात कशा प्रकारे त्वचेवर उपचार करता येऊ शकत, आणि ह्याच्या मदतीने कशा प्रकारे समस्यांचा नायनाट करू शकतो.
 
अशा प्रकारे बनवा संत्र्याच्या सालीची भुकटी -
हे बनविण्यासाठी आपल्याला दोन ते चार संत्रे लागतील. या साठी संत्र्याचे साल उन्हात वाळण्यासाठी ठेवा. पूर्णपणे वाळल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या आता  एक चमचा पूड वाटीमध्ये घेऊन या मध्ये थोडंसं गुलाबपाणी आणि 2 मोठे चमचे हळद मिसळून ह्याची पेस्ट बनवून घ्या.
 
अशा प्रकारे पूड चेहऱ्यावर वापरा - 
संत्र्याच्या सालीने बनलेली पूड चेहऱ्यावर वापरण्या पूर्वी चेहरा पाण्याने धुऊन घ्या. डोळ्या ला आणि ओठांना वगळता ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे तसेच सोडा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या आणि स्वच्छ कपड्याने चेहरा स्वच्छ करा. या मुळे आपल्या चेहऱ्यावर चकाकी आणि तजेलपणा येईल.
 
तेलकट त्वचे साठी पॅक असा बनवा-
त्वचेचे तज्ज्ञ म्हणतात की तेलकट त्वचेमुळे अनेक समस्या होऊ शकतात. या मुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. अशा मध्ये संत्र्याच्या सालांची पूड केल्याने हे खूप फायदेशीर होऊ शकत. हे बनविण्यासाठी एका वाटीत 1 मोठे चमचे संत्र्याच्या सालाची पूड आणि 1 चमचा दूध किंवा दही मिसळून पॅक तयार करा. आता हे पॅक आपल्या चेहऱ्याला चांगल्या प्रकारे लावा हे पॅक वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. अशा प्रकारे आठवड्यातून किमान 2 किंवा 3 वेळा करून आपल्याला चेहऱ्यात बदल जाणवेल. काहीच महिन्यात चेहरा डाग मुक्त असेल.
 
* डल किंवा निस्तेज चेहऱ्यावर अशी चमक आणा -
चेहऱ्याच्या समस्यां असल्यामुळे चेहरा निस्तेज होतो. त्यावरील चमक नाहीशी होते. चेहऱ्यावरील चमक पुन्हा आणण्यासाठी आवश्यक आहे संत्र्याचे  सेवन करण्यासह त्याचा वापर चेहऱ्यावर देखील करावे. या साठी आपल्याला संत्र्याच्या सालीची पूड आणि दोन मोठे चमचे मधाची गरज आहे. हे दोन्ही एकत्र मिसळा. आता या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावून सुकू द्या. नंतर चेहरा आणि मान कोमट पाण्याने धुऊन घ्या. या मुळे आपल्या चेहऱ्यावर तेज येईल आणि आपले सौंदर्य उजळून निघेल.
 
संत्र्याच्या सालापासून इतर काही समस्या जसे की - डाग, टॅनिग, आणि मुरूम देखील दूर केले जाऊ शकते. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी एका वाटीत एक मोठा चमचा संत्र्याच्या सालाची पूड, एक चमचा हरभराच्या डाळीचे पीठ, आणि गुलाबपाणी किंवा दूध मिसळून एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून तसेच ठेवा. या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन स्वच्छ करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती