Beauty tips : उन्हाळ्यात चेहरा धुताना या गोष्टींची काळजी घ्या, त्वचा दिवसभर ताजी आणि चमकदार राहील

रविवार, 19 जून 2022 (16:53 IST)
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळा सुरू झाला की रॅश, टॅनिंग, सनबर्न, रॅशेस यासारख्या समस्या सुरू होतात. या हंगामात चेहरा धुताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.चला जाणून घेऊ या.
 
1 फेस वॉशचा वारंवार वापर करू नका -
उन्हाळ्यात, घाम आणि वास दूर करण्यासाठी लोक फेसवॉशचा वापर करतात. पण त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. फेसवॉशच्या अतिवापरामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते आणि चमक कमी होते. त्यामुळे फेस वॉशचा वारंवार वापर करू नका.
 
2 चेहऱ्यावर घामाचे हात लावू नका -
 
उन्हाळ्यात जास्त घामामुळे त्वचा फिकी पडते. त्यामुळे या हंगामात घाम पुसण्यासाठी सुती रुमाल सोबत ठेवा. तसेच, आपल्या चेहऱ्यावर वारंवार घामाने हात लावणे टाळा कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो.
 
3 सनस्क्रीन लावायला विसरू नका-
उन्हाळ्यात चेहरा धुतल्यानंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका. उन्हाळ्याच्या हंगामात, कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा होरपळते. सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे उन्हापासून संरक्षण होते आणि त्वचा चमकदार होते.
 
4 रात्री चेहरा स्वच्छ करून झोपा -
रात्री झोपण्यापूर्वी फेस वॉश आणि मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका. दिवसभर घाम आणि धुळीमुळे त्वचेवर पिंपल्स, काळे डाग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती