अनेक लोक सुंदर दिसण्याकरिता नेल एक्सटेंशन करतात. आणि नंतर अनेक समस्या येतात. नेल एक्सटेंशन केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
अनेकदा आपण डार्क कलरचा नेलकलर निवडतो. असे न करता आपल्या स्किन कलर च्या नुसार कलरची निवड करा. यामुळे हे नखे प्रत्येक प्रकारच्या कपडयांवर सूट होतील अणि हे दिसायला पण चांगले दिसतील.
नेल एक्सटेंशन जास्त करून हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी करतात. तर काही लोक नखांचा आकार वाढवण्यासाठी करतात. नेल एक्सटेंशन हातावर कमीतकमी एक महीना राहते. नेल एक्सटेंशन करतांना आपण अनेक वेळेस नखांचा आकार वाढवून घेतो. जर तुम्ही घरात काम करात असाल किंवा नोकरी करत असाल तर नेल एक्सटेंशनचा साइज वाढवू नका.
नेल एक्सटेंशन करण्यसाठी बनावटी नखांना ग्लू च्या मदतीने चिटकवले जाते. अशात जर तुम्ही नखे लावल्यानंतर भांडी घासत असाल तर तुम्ही नेल एक्सटेंशन करू नये. चुकूनही तुमच्या नखांवर दुखापत झाली तर दुखणे वाढू शकते. तुम्ही रोज क्यूटिकल ऑइल तुमच्या नखांवर लावावे. यामुळे तुमचे नेल कोरडे होणार नाही.
नेल एक्सटेंशन जर तुम्ही वारंवार करत असाल तर तुमचे नखे खराब होऊ शकतात .
नेल एक्सटेंशन वारंवार करणे चांगले नाही. नेल एक्सटेंशन केल्यानंतर पुन्हा लगेच करू नये थोडा वेळ दयावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.