Natural tips in winter थंडीत त्वचेला मुलायम राखण्यासाठी काही नॅचरल टिप्स..

रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (17:27 IST)
थंडीतही त्वचा उजळ आणि सुंदर असावी यासाठी खर्चिक रासायनिक मॉयश्चरायझर वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक पर्यायही उपलब्ध आहेत. बोचऱया थंडीत त्वचेला मुलायम राखण्यासाठी काही नॅचरल टिप्स..
 
कोरफड- बहुगुणी कोरफड त्वचा कोरडी पडली असल्यास कोरफडीचा गर किंवा रस त्वचा मुलायम आणि तजेलदार राखण्यासाठी उपयोगी ठरतो.
 
गुलाबपाणी- गुलाब पाण्याचा त्वचेवर वापर केल्याने चेहऱयावरील ब्लॅकहेड्स, तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते. 
 
मध- त्वचेचा मखमलीपणा कायम राखण्यासाठी मधाचा उपयोग होतो. त्याचबरोबर चेहऱयावरील पुरळ घालविण्यासाठीही मधाचा उपयोग केला जातो. 
 
ऑलिव्ह ऑईल- थंडीमुळे रखरखीत झालेल्या त्वचेला मुलायम बनविण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग केला जातो. परंतु, या ऑईलचा उपयोगही योग्य प्रमाणात करायला हवा. बाजारात सध्या ऑलिव्ह ऑईलचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती