Turmeric face pack: हळदीचा त्वचेवर उपयोग करतांना या गोष्टी लक्षात ठेवा

रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (07:30 IST)
भारतीय स्वयंपाकघरात अशा काही वस्तु असतात, ज्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. या वस्तूंमध्ये हळद देखील आहे. हळद मध्ये अनेक गुणधर्म असतात जे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करतात. बाजारात मिळणारे अनेक स्किन केयर प्रोडक्ट मध्ये हळद वापरली जाते. तसेच काही लोक घरी बनवलेला हळदीचा फेस पॅक देखील चेहऱ्याला लावतात. हळद चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. चला तर जाणून घेऊ या हळद वापरतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. 
 
चेहऱ्याला जर हळदीचा फेस पॅक लावला असेल तर वेळीच तो साफ करून घेणे, जर असे केले नाही तर चेहरा पिवळा होईल. म्हणून हळदीचा फेस पैक लावल्यानंतर तो थोडया वेळाने लगेच साफ करा. 
 
हळदीचा फेसपॅक बनवतांना या गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला कुठली वस्तु सूट होते. किंवा ज्याने तुम्हाला एलर्जी होईल असे असे प्रोडक्ट चेहऱ्यावर लावू नका. 
 
चेहऱ्यावर जर तुम्ही हळदीने बनलेल्या फेसपॅक लावला असेल तर त्या नंतर लगेच साबण चेहऱ्याला लावू नका. हळदीचा फेसपॅक लावल्यानंतर थंड पानी किंवा कोमट पाण्याने चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा . 
 
हळदीला नेहमी चेहऱ्याला लावतांना योग्य मात्रेत घ्या. चेहरा तसेच मानेला देखील व्यवस्थित लावा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती