परफ्यूमचा अतिरेकही चांगला नाही

परफ्यूम वापरणं ही चैन न राहता जीवनशैलीचा एक भाग बनत आहे. रोज सकाळी छानसं परफ्यूम मारल्यानंतर दिवसभर ताजेपणा टिकून राहतो. मात्र हे वापरतानाही काही काळजी घ्यायला हवी. कधीकधी परफ्यूम फवारल्यावर त्वचा जळजळते आणि त्याजागी लालसर चट्टे पडतात. 
बरेच दिवस एकच परफ्यूम वापरत राहिल्यास नाकाची त्या सुगंधाप्रती संवेदना नष्ट होऊन वास येणं बंद होतं. 
 
परफ्यूममध्ये अल्कोहोलचा वापर होत असल्यानं त्वचेवर दीर्घकालीन परिणाम होतो. म्हणूनच परफ्यूमचा अतिरेकी वापर थांबवायला हवा. 
 
प्रखर सूर्यप्रकाशाचाही परफ्यूमवर विपरीत परिणाम होत असतो. काही रासायनिक प्रक्रिया होऊन त्वचा जळजळणे, डागाळणे संभवते. म्हणूनच त्वचेच्या थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येणार्‍या भागावर परफ्यूम फवारावं. परफ्यूमपेक्षा बॉडी लोशनचा वापर जास्त सुरक्षित आहे.

वेबदुनिया वर वाचा