सुंदरतेसाठी अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे पदार्थ...

अंघोळीने शरीराला सकारात्मक रूपाने आराम मिळतो आणि ताणही कमी होतो. असेच नैसर्गिक रूपाने सुंदरता वाढवायची असल्यास काही सोपे उपाय आहे. यासाठी आपल्याला काही वेगळे करायचे नसून केवळ अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळायचे आहे.
वाइन
वाइन सौंदर्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे ज्याने त्वचा नरम आणि ताजीतवानी राहते. याने त्वचेला पुनर्जीवन मिळतं. यात आढळणारे अॅटीऑक्सीडेंट्स वेळेपूर्वी येणार्‍या सुरकुत्या रोखण्यात मदत करतं. आपल्याला केवळ 5 ते 6 चमचे वाइन पाण्यात मिसळायची आहे.
 
ग्रीन टी
अंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी मिसळळ्याने त्वचा आणि केसांनाही फायदा होतो. यात आढळणारे अॅटीऑक्सींडे्टस त्वचा स्वच्छ ठेवतं. ग्रीन टीमध्ये केस बुडवून ठेवल्याने केस लांब आणि मजबूत होतात. ग्रीन टी नसल्यास आपण पेपरमिंट, लेमन टी किंवा इतर हर्बल टी मिसळू शकता.

मध
मधामध्ये अॅटीव्हायरल आणि अॅटीबॅक्टिरिअल गुण आढळतात ज्याने त्वचेला लाभ मिळतो. अंघोळीच्या पाण्यात मध मिसळळ्याने त्वचा मुलायम राहते. रुक्ष, वाळलेली आणि संवेदनशील त्वचेसाठी हे लाभदायक आहे. कोमट पाण्यात 10-12 चमचे मध मिसळून या पाण्यात काही वेळ बसून राहा.
 
दूध
दूध शरीर आणि त्वचेसाठी लाभदायक असतं. दुधात आढळणारे व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स त्वचेला चमकदार आणि हाइड्रेटेट ठेवतात. कोमट पाण्यात एक दूध मिसळा आणि त्यात 15 ते 20 मिनिट आराम करा.
 
ओट्स
ओटमील बाथ त्वचेला खोल पर्यंत स्वच्छ करतं. पाण्यात काही ओट्स मिसळा आणि त्यात आराम करा. खाज सुटणे, रुक्ष त्वचा, संवेदनशील त्वचा यावर ओटमील बाथ लाभदायक ठरेल.

बाथ सॉल्ट
बाथ सॉल्ट त्वचा स्वच्छ करण्यात मदत करतं. याने त्वचेवरील जमलेली धूळ आणि घाण स्वच्छ होते. डेड स्कीन काढण्यासाठी बाथ सॉल्ट उपयोगी ठरतं. म्हणून अंघोळीच्या पाण्यात 2 ते 3 चमचे बाथ सॉल्ट मिसळून त्यात आराम करावा.
 
हर्ब्स
पाण्यात हर्ब्स मिळळ्याने त्वचा मुलायम होते. आपल्या ब्लड सर्कुलेशनला उत्तेजित करणारे हर्ब्स वापरायला हवे. हर्ब्सला त्वचा आणि शरीराला आराम मिळतो.
 
नाराळाचे तेल
अंघोळीच्या पाण्यात नाराळाचे तेल मिसळळ्याने त्वचेला आणि शरीराला लाभ मिळतं. याने जळजळ, सूज दूर होते. त्वचा खूप काळासाठी हायड्रेट राहते. याव्यतिरिक्त आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल मिसळू शकता. आपल्याला आपल्या त्वचेप्रमाणे तेल निवडायला हवे.

वेबदुनिया वर वाचा