hair black at home घरगुती पद्धतीने करा केस काळे

शनिवार, 28 जानेवारी 2023 (19:13 IST)
कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या जीवनात केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पांढरे केस पुन्हा काळे करू शकतात. 
 
* अर्धा कप दह्यात चिमूटभर मिरपूड आणि चमचाभर लिंबाचा रस मिसळून केसांवर लावावे.
 
* दररोज साजुक तुपाने डोक्याची मालीश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
 
* आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस घालून तयार झालेली पेस्ट केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात.
 
* दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतील.
 
* तीळ खाल्ल्याने व तिळाचे तेल केसांवर लावल्याने फायदा दिसून येईल.
 
* कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.
 
* दूध अथवा दह्यात बेसन घालून केसांवर लावल्याने लाभ होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती