लूफाने अंघोळ करत आहात का जाणून घ्या नुकसान

मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (11:45 IST)
बॅक्टेरिया तसेच स्किन इन्फेक्शनचे  कारण लूफा बनू शकते. 
लूफावर बॅक्टेरिया, कीटाणु आणि यीस्ट हे निर्माण होतात. 
इन्फेक्शन सोबत त्वचेवर पुरळ पण येऊ शकतात. 
या समस्या लूफामध्ये ओलाव्याने निर्माण होतात. 
 
Loofah Side Effects : आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या ब्युटी टिप्स शेयर केल्या जातात. सोबतच रील आणि शॉर्ट वीडियो देखील जास्त प्रमाणात शेयर होतात. या वीडियोंमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स दाखवले जातात. आणि असे सांगितले जाते की हे वापरल्यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळेल. विशेषता सोशल मीडियावर काही इन्फ्लुएंसर या प्रोडक्ट बद्द्ल खरी माहिती पण देतात . 
 
सोशल मिडीयाच्या या काळात ब्युटी स्टॅंडर्ड जास्त वाढले आहेत. अशावेळेस अनेक लोक विविध प्रकारचे देशी उपाय , कोरियन आणि जापानी उपाय पण करतात ज्यामुळे त्यांची त्वचा गोरी होईल. अशामध्ये सर्वात जास्त वायरल लूफाचा ट्रेंड आहे. लूफा हे एक प्रकारचे प्लास्टिक पासून बनलेले एक स्क्रब आहे. यावर बॉडीवॉश टाकून शरीराला स्क्रब केले जाते. पण जाणून घ्या की लूफा तुमच्या त्वचेसाठी फायदेमंद नाही. यामुळे तुम्हाला त्वचेचे संसर्ग होऊ शकते. चला जाणून घेऊया याचे नुकसान.
 
लूफाचा उपयोग का केला जातो? 
लूफा जेलला आणि बॉडीवॉशला लगेच त्वचेवर पसरवतो यामूळे चांगला फेस तयार होतो. लूफा खरखरीत असतो लूफा बॉडीवर स्क्रबची प्रक्रिया करतो याने शरीरावरील मळ निघून जातो लूफाच्या वापरामुळे चांगल्या स्वच्छते परिणाम मिळतात. घाम, मळ इतर प्रकरच्या समस्यांना लूफा लगेच स्वच्छ करतो या व्यतिरिक्त शरीरावरील बेक्टेरियाला दूर करतो.
 
लूफामुळे त्वचेला काय नुकसान आहे? 
लूफावर जेल किंवा लिक्विड टाकल्यानंतर व  टाकण्यापूर्वी याला ओले करावे लागते लूफा खूप वेळापर्यंत ओला राहतो ज्यामुळे यावर बॅक्टेरिया, कीटाणु आणि यीस्ट निर्माण होतात. लूफा मध्ये निर्माण झालेले बॅक्टेरिया, कीटाणु आणि यीस्ट तुमच्या शरीरावर फेस व्दारा पसरतात. तुम्ही लूफाचा वापर शरीराच्या प्रत्येक अवयवावर  करता. जिथून बॅक्टेरिया कधी कधी पाण्याच्या वापरा मुळे निघत नाही तर ते अजून पसरतात. यामुळे त्वचेचे संसर्ग होण्याची शक्यता असते. इन्फेक्शन सोबतच तुमच्या त्वचेवर पुरळ , मुरूम येतात. 
 
लूफाला दररोज वापरा किंवा कधी कधी वापरा पण काही गोष्टींना लक्षात  ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही याचा सुरक्षित वापर करू शकाल. त्वचेची समस्या लूफामध्ये असलेल्या ओलाव्याने निर्माण होते, म्हणून तुम्ही याला व्यवस्थित सुखावून घ्या. जर तुम्ही सूर्यप्रकाशात लूफाला वाळवले तर त्यातील बॅक्टेरिया नष्ट होईल आणि लूफाचा उपयोग सुरक्षित राहील. लूफाला वेळोवेळी बदलत राहावे  .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती