Itchy Scalp Home Remedies: डोक्याला खाज सुटण्याचा त्रास होत असेल तर हे प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

शुक्रवार, 31 मार्च 2023 (16:35 IST)
आजच्या काळात अनेकांना डोके खाजण्याचा त्रास होतो. धूळ, केसांचा रंग, बुरशीजन्य संसर्ग, उवा, कोंडा, ताण आणि सेबोरेरिक त्वचारोग यामुळे टाळूला खाज सुटू शकते. अनेक वेळा शॅम्पू केल्यानंतरही केस व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत आणि डोक्यात घाण साचून राहते. त्यामुळे जास्त खाज सुटते. सतत खाज सुटल्यामुळे, चिडचिड सुरू होते आणि माणसाला लोकांसमोर लाज वाटते काही घरगुती उपाय अवलंबवून डोक्याच्या खाज पासून मुक्ती मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊ या. 
 
दही-
डोक्याची खाज दूर करण्यासाठी दह्याचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. डोक्यावर दही लावल्याने खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. जर तुम्हालाही डोक्यात खाज येत असेल तर दह्याने टाळूची मालिश करा. असे आठवड्यातून 3-4 वेळा केल्यास खाज सुटण्यापासून आराम मिळेल. त्याचबरोबर दही वापरल्याने केस मऊ आणि चमकदार होतात. 
 
लिंबू-
डोके खाज सुटण्यासाठी देखील लिंबाचा वापर करणे खूप फायदेशीर आहे. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आढळते. लिंबू डोक्याला लावल्याने खाज सुटते. 
 
खोबरेल तेल आणि कापूर-
डोक्याची खाज दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूरचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे डोक्यातील खाज सुटण्यापासून आराम मिळतो. यासाठी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून डोक्याला थोडा वेळ मसाज करा. त्यामुळे डोक्याच्या खाज सुटण्यामध्ये आराम मिळतो.
 
कांद्याचा रस-
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. टाळूवर लावल्याने डोक्याची खाज सुटते. यासाठी कांद्याचा रस काढा. त्यानंतर हा रस कापसाच्या मदतीने डोक्याला लावा. ते लावल्यानंतर, 20 मिनिटे असेच राहू द्या. नंतर केस पाण्याने धुवा. यामुळे तुमचे केसही मुलायम आणि चमकदार होतील. यासोबतच केसगळतीही कमी होईल.
 
Edited By - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती