आपल्याकडे बर्याच महिला पेल शेड्स वापरतात, मात्र भारतीय लोकांच्या त्वचेचा रंग बघता त्यांच्या स्किनटोनला या शेड्स मॅच होत नाहीत. त्यामुळे लाईट कलरपेक्षा एक शेड डार्कर टोन निवडा. सर्वसाधारणपणे पिंकीश मॉव कलर सगळ्या स्किनटोनवर मॅच होतो.
पार्टीसाठी सज्ज होत असाल तर पेहरावाच्या रंगाशी मिळतीजुळती आयश्ॉडो निवडा. साधारणत: लाईट ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन या शेड्स सर्व प्रकारच्या स्किनटोनवर मॅच होतात. आयलाईनर, मस्कारा आणि काजळ डोळ्यांची आकर्षकता वाढवते.
केस मोकळे सोडायचे असतील तर स्ट्रेटनिंगचा पर्याय योग्य ठरतो. यामुळे केसांना आपोआपच एक छानसा मॉडर्न लूक मिळतो. क्रिंपिंग, रोलर अथवा ड्रायर सेटिंगमुळेही केसांना स्टायलिश रूप देता येतं. सध्या लेयर्स आणि रेजर फॅशन चलतीत आहे.