सतत धुणे
चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या नादात काहीजण वारंवार फेस वॉश व क्लिंझरने तो धुतात. यामुळे त्वचेचे नुकसान होते. परिणामी त्वचा कोरडी किंवा तेलकट होते. तर तुम्ही मेकअप, सनस्क्रीन व अन्य कुठले लोशन लावलेले नाही तर मग चेहरा केवळ पाण्याने धुतला तरी चालेल. अशावेळी क्लिझिंग एकदाच करावे व रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
चुकीच्या उत्पादनांची निवड
क्लिंझरची निवड काळजीपूर्वक करावी. कारण त्याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. क्लिंझर खूप स्ट्रॉंग असू नये व खूप सौम्यही असू नये.