पायांपाशी ध्यान नित्य असू द्यावे, हे वाक्य कोणत्याही वयात व कोणत्याही तूत विसरु देऊ नका. पाय नेहमी झाकलेले असल्याने कित्येकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. पण आपले सारे शरीर पेलणारे, उभे करु शकणारे पाय नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेत. आपल्याकडे साहित्यात स्त्रीच्या सुंदर पायांची वर्णने आली आहेत. चीन व जपानमध्ये स्त्रीच्या सुंदर पायांसाठी लहानपणापासून विशेष प्रयत्न केले जातात. पण पाय केवळ आकर्षक, सुंदर असून चालत नाहीत, ते सुदृढही असावे लागतात. त्यामुळे पायांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.
* पावलांना आरामदायी वाटेल अशा चपला, बूट निवडा. बोटांपाशी त्या सैल असू द्या.
* उंच टाचांच्या व पुढे निमुळत्या चपला पायांवर अनावश्यक ताण देतात. शरीराचा तोल सावरण्यासाठी पायावर ताण येतो. पावलांचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अशा चपला टाळाव्यात.