Sweat Proof Makeup: घामामुळे मेकअप खराब होत असेल तर लक्षात ठेवा या 5 गोष्टी

बुधवार, 8 जुलै 2020 (13:09 IST)
उन्हाळा आणि पावसाळा यादरम्यान घामामुळे मेकअप बिघडण्याची शक्यता असते. अशात आपला मेकअप चेहऱ्यावर जास्त काळ टिकून राहण्यासाठी काही सोप्या स्टेप्सची मदत घेतली जाऊ शकते.
 
1. त्वचेला थंड ठेवा : 
चेहऱ्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यावर आईसपॅड किंवा आईस रोलर्सच्या साहाय्याने थंड ठेवणं जास्त गरजेचं आहे. याने चेहऱ्यावर 1- 2 मिनिटे मसाज करा आणि 5 मिनिटासाठी असेच ठेवा. त्वचा थंड ठेवल्यामुळे त्वचेचे छिद्र आकुंचन पावण्यासाठी मदत मिळते आणि त्याच बरोबर त्वचेमध्ये जास्त प्रमाणात तेल बनत नाही.
 
2 टोनरचा वापर करणे गरजेचे: 
आपल्या चेहऱ्याच्या गरजेप्रमाणे कोणत्याही टोनरचा वापर करावा. ज्यांची त्वचा तेलकट आहे, ते ऑइल फ्री टोनरचा वापरू शकतात, ज्यांची त्वचा कोरडी आहे, ते हाइड्रेटिंग टोनरचा वापर करू शकतात.
 
3 नेहमीच प्रायमर वापरा: 
त्वचेला मऊ बनविण्यासाठी जेल/सिलिकॉन बेस्ड प्रायमरचा वापर करणं खूप गरजेचं असतं. यामुळे मेकअप चांगल्या प्रकारे बसतं आणि टिकून राहतं.
 
4 ऑइल फ्री, वॉटरप्रूफ प्रॉडक्ट : 
तेलकट किंवा क्रीम बेस्ड मेकअप घामाबरोबर वाहून जातात. यासाठी मेकअपला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी वॉटर प्रूफ किंवा मॅट विधीचा वापर करावा. अशाने आपण स्वतःला जास्त काळ पर्यंत तजेल बनवून ठेवाल.
 
5 ब्लॉटिंग तंत्र :
चेहऱ्यावर मेकअप लावल्यावर आणि सेटिंग स्प्रे शिंपडण्यापूर्वी ब्लॉटिंग पावडर लावणं विसरू नये. जर आपण फाउंडेशन वापरत नसाल तर या दरम्यान ब्लॉटिंग पेपरचा वापर सहजरीत्या करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती