शरीरावर लठ्ठपणा मुळे स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. तसेच बायकांमध्ये गरोदरपणानंतर पोटाच्या भागास स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. जे दिसायला फारच वाईट असतात. अश्या परिस्थितीत कोणत्याही प्रकाराचा ड्रेस घातल्यावर लाजिरवाणी होत. पण आता आपल्याला या स्ट्रेच मार्क्स पासून घाबरायची किंवा लाजायची गरज नाही. या स्ट्रेच मार्क्सला आपण मेकअपच्या साह्यायाने लपवू शकतो. चला तर मग जाणून घेउया मेकअपच्या काही सोप्या टिप्स.
योग्य कलर निवडा:
सर्वात आधी हे जाणून घ्या की कोणत्याही प्रकाराचे मार्क्स लपविण्यासाठी योग्य कलर निवडा. जर स्ट्रेच मार्क्स लाल किंवा जांभळे दिसत आहे तर या साठी पिवळ्या रंगाचे करेक्टर निवडणं चांगले आहे. तेच जुने मार्क्स शरीराच्या रंगाचे होतात त्यासाठी कोणत्याही प्रकारचे करेक्टरची गरज नसते कारण हे फार फिकट रंगाचे असतात.